Ad will apear here
Next
पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे रविवारी दिवाळी पहाटचे आयोजन
पं. विजय घाटे, राकेश चौरसिया यांचा सहभाग
पुणे : ‘दिवाळी पहाट’ संस्कृतीची सुरुवात करणाऱ्या त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे आयोजित सत्ताविसावी दिवाळी पहाट रविवारी, २७ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात रंगणार आहे.

 सूर-ताल-नृत्य-गायन यांचा संगम असणाऱ्या ‘दीप-सूर तेजाळती’ नावाच्या या मैफलीत पं. राकेश चौरसिया यांचे बासरीवादन, पं. विजय घाटे यांचा तबला, शीतल कोलवालकर यांचे कथक नृत्य, श्रीधर पार्थसारथी यांचे मृदंगवादन, सुरंजन रघुनाथ यांचे गायन आणि श्रीराम हसबनीस यांचे हार्मोनियमवादन रसिकांना ऐकता येणार आहे.

या वेळी शंभर वर्षे पूर्ण केलेल्या पुण्यातील दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लिमिटेड, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महात्मा फुले वसतिगृह, डेक्कन मुस्लिम लायब्ररी आणि कँप एज्युकेशन सोसायटी या संस्थांचा सत्कार करण्यात येणार आहे.  

याबाबत अधिक माहिती देताना त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई म्हणाले, दिवाळी पहाटचा कार्यक्रम करण्यास प्रथम त्रिदलने १९९२पासून  सुरुवात केली. आता विदेशातही मराठी लोक दिवाळी पहाट कार्यक्रम करू लागले आहेत. संस्थेने या कार्यक्रमाचे वेगळेपणही जपले आहे. यात पाच पुणेकरांचा ‘पक्के पुणेकर’ असा सन्मान केला जातो. गायिका किशोरी आमोणकर ते पंडित जसराज यासारख्या दिग्गज कलाकारांनी ही मैफल सजवली आहे. या वर्षीदेखील  नावाजलेल्या कलाकारांच्या सादरीकरणाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.’  

या कार्यक्रमासाठी बाल्कनीतील प्रवेश विनामूल्य असून, तेथे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZTCCF
Similar Posts
जवानांवरील हल्ल्याचा ‘पुण्यभूषण’कडून निषेध पुणे : काश्मीरमधील जवानांवरील दहशतवादी हल्ल्याचा पुण्यभूषण फाउंडेशनकडून निषेध करण्यात आला आहे. ‘हा हल्ला म्हणजे भारतीय लोकशाहीवरील हल्ला आहे. भारतीय सहनशीलतेची परीक्षा असून, आपण जशास तसे उत्तर देऊन जवानांच्या मृत्यूचा बदला घेतला पाहिजे’, अशी भावना ‘पुण्यभूषण’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे आहे
वाडेश्वर कट्ट्यावर पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन पुणे : पुणे शहराला समर्पित असलेल्या पुण्यभूषण या अभिनव दिवाळी अंकाचे प्रकाशन नुकतेच वाडेश्वर कट्ट्यावर झाले. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, अभिनेते प्रवीण तरडे आणि खवैय्या पुणेकरांची मनोभावे खान-पान सेवा करणारे वाडेश्वरचे ज्येष्ठ कामगार तुकाराम कुमकर यांच्या हस्ते या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले
‘दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरांनी टिकवले’ पुणे : ‘दिवाळी अंकाचे पावित्र्य पुणेकरांनी टिकवले. पुणेरी संस्कार, घटना, इतिहास याची नोंद पुण्यभूषण दिवाळी अंक घेतो, त्यामुळे हा अंक वैशिष्टयपूर्ण आहे,’ असे उद्गार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढले.
पुण्यात रंगली धमाल दिवाळी पहाट! पुणे : अवीट गोडीची गाणी, विनोदाचे षटकार, धमाल एकपात्री सादरीकरण अशा विविध टप्प्यांवर उत्तरोत्तर रंगत गेलेली दिवाळी पहाट खऱ्या अर्थाने कळसावर पोहोचली ती कलाकार आणि उपस्थित रसिकांनी घेतलेल्या ‘सिंगल यूज प्लास्टिक’ न वापरण्याच्या शपथेने. ‘संवाद, पुणे’ आणि एस. व्ही. इव्हेंट्स प्रस्तुत ‘रंगारंग धम्माल दिवाळी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language